मुंबई – सोनू निगम यांनीही बॉलीवूडच्या संगीत उद्योगात माफिया असल्याचे आणि युवा गायकांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. टी-सीरिजचा मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने पुन्हा एकदा सोनू निमगवर निशाणा साधला होता. तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने सोनू निमगने भूषण कुमारवर केलेल्या आरोपांचे उत्तर दिले होते.
तर आता दिव्या यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. दिव्या यांनी एक पोस्ट करत ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. कारण या पोस्टमध्ये त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला दाखवले होते. पण स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओमध्ये घेतल्यामुळे दिव्या यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
‘माझ्या वर्ल्ड फेमस कुकसोबत एक फोटो, शेरुने बनवलेली मिठाई खा आणि राग कमी करा. नाही तर शेरुच्या शापाने तुमचे नाक मोठे होईल’ असे त्यांनी फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले असून ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.
गुलशन कुमार यांनी सोनू निगमला दिल्लीमध्ये रामलीलामध्ये पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सोनू यांना विमानाची तिकिटे देऊन मुंबईला येण्यास सांगितले होते. गुलशन कुमार यांनी सोनू निगमला बेटा तुला मोठा स्टार बनवेन असे म्हटले असल्याचे दिव्या यांनी पुढे सांगितले होते. दरम्यान दिव्या यांनी त्यांच्या घरात गेली कित्येक वर्षे स्वयंपाक करणाऱ्या शेरुला तेथे बोलावले. पण नेटकऱ्यांना ते फारसे आवडले नव्हते. नेटकऱ्यांनी दिव्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली होती. आता दिव्या यांनी पोस्ट करत नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे.