दुबई – संयुक्त अरब अमिराती हा मुस्लिम देश असला तरी आधुनिकतेचे वारे या देशांमध्ये वाहत असून लग्न आणि घटस्फोट याबाबतही आधुनिक घटना त्या ठिकाणी घडत आहेत लग्नानंतरअत्यंत कमी कालावधीमध्ये घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले असून लग्नानंतर फक्त दोन ते दहा दिवसांमध्ये जोडप्यांनी घटस्फोट घेतल्याचे उघडकिस आले आहे.
2022 या एका वर्षात अशा प्रकारच्या दहा घटना उघडकीस आल्या आहेत एकीकडे अरब अमीरातीमध्ये लग्नाच्या 56 वर्षानंतर म्हणजे 56 वर्षे संसार केल्यानंतर सुद्धा घटस्फोट घेण्याचे प्रकार उघडकीस येत असताना दुसरीकडे लग्नानंतर दुसऱ्या दिवशी किंवा दहा दिवसांच्या आतच घटस्फोट घेण्याचे प्रकारही वाढले आहेत 2022 च्या एका वर्षामध्ये लग्नानंतर दोन दिवसातच अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतले तर चार जोडप्यांनी लग्नानंतर दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपले संबंध संपवले मिनिस्ट्री ऑफ जस्टीसने जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
त्याप्रमाणे या एका वर्षामध्ये 596 जोडप्यांनी घटस्फोट घेतले त्यापैकी 290 जोडपी स्थानिक नागरिकच होते तर उर्वरित जोडपी ही काही कारणाने अमिरातीत राहायला आलेले परदेशी नागरिक होते विवाह समूपदेशकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लग्न होण्यासाठी केलेली विनाकारण घाई किंवा घाईगडबडीने घेतलेला निर्णय विवाह बाह्य संबंध उघडकिस येणे अशा प्रकारच्या कारणांमुळेच हे घटस्फोटाचे प्रकार घडले आहेत जोडप्यातील दोघांनाही कोणत्या प्रकारची जबाबदारी घेण्याची इच्छा नव्हती म्हणूनच त्यांनी वैवाहिक संबंध संपवण्याचा निर्णय घेतला काही जणांना फक्त विवाह समारंभाचे आकर्षण होते आणि विवाहसमारंभ पार पडल्यानंतर प्रत्यक्ष वैवाहिक संबंधाबाबत मात्र त्यांना फारसा उत्साह नव्हता त्यातूनच हे घटस्फोटाचे प्रमाण वाढत गेले तरुण लोकांनी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांकडून समुपदेशन घ्यावे असा सल्ला आता देण्यात येत आहे.