जिल्हा गारठला; तापमान 11 अंशांपर्यंत खाली

बारामती – यंदाच्या गुरुवारी (दि. 30) तापमानाचा पारा 11 अंशांवर आल्याने थंडीचा अनुभव जिल्ह्यातील मंडिळांना घेता आल्याचे बोललेले जात आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे राज्याच्या विविध भागांतही थंडी वाढली आहे. ही स्थिती फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे.

पुणे जिल्ह्याचे किमान तापमानात घट झाल्याने रात्रीच्या थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी किमान तापमान 11 अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्याचबरोबर दिवसाच्या कमाल तापमानातही मोठी घट नोंदविली गेल्याने दिवसाही काहीसा गारवा जाणवला. बारामतीसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार नोंदविले जात आहेत. जानेवारीच्या मध्यापासून शहरात कमी-अधिक प्रमाणात थंडी आहे. किमान तापमानात वाढ होऊन ते 15 अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याने थंडी कमी झाली होती.

मात्र, मंगळवारी संध्याकाळपासून पुन्हा हवेत गारवा जाणवू लागला आहे. मंगळवारी शहर आणि परिसरातील किमान तापमान 15.3 अंश नोंदविले गेले होते. त्यात बुधवारी झपाट्याने घट होत 13.6 अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे संध्याकाळनंतर हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. गुरुवारी त्यात आणखी घट होऊन हे तापमान 11 अंशसेल्सिअसपर्यंत खाली घसरले. कमाल तापमानात घट झाल्याने दिवसासुद्धा गारठा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात 30 अंशांपुढे असलेले कमाल तापमान गुरुवारी 26.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. हे तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांनी कमी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.