अकरा मंडळांत अतिवृष्टी
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी मंडळामध्ये 62,पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी मंडळात 80,टाकळीमानूर 62,शेवगावमधील बोधेगाव मंडळात 94,चापडगाव 88,संगमनेरमध्ये आश्वीात 65,साकूर 71,घारगाव 98,डोळासणे 65,पिंपरणे 77,अकोले मंडळात 77 मिलीमीटर पाऊस झाला.
नगर – शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली.शहरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. कल्याण रोडवरील परिसरातील व कोर्ट गल्लीत अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले.पावसामुळे सीना नदीला रात्री पुन्हा पूर आला होता. जिल्ह्यात आतापर्यंत 149 टक्के पाऊस झाला आहे.94 महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. उत्तरेत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परंतु दक्षिणेच्या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला असला तरी तलाव मात्र कोरडेठाक आहेत. नगर तालुक्यासह दक्षिणेतील अनेक तालुक्यात दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.
शहरात झालेल्या दमदार पावसामुळे कल्याण रोड परिसरातील कल्याण रोड परिसरातील भावनाऋषी सोसायटीमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.