राधानगरीचा एक दरवाजा उघडला
कोल्हापूर – गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणार्या घाटमाथ्यावर ती मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळी मध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. धरणांतून प्रतिसेकंद 2828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पुन्हा भोगावती नदी ची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.