पुणे – महाराष्ट्रीय मंडळाकडून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे.
मंडळाने या स्पर्धेचे आयोजन जोशीज बॅडमिंटन अकादमी व देवधर बॅडमिंटन क्लब यांच्या सहकार्याने केले आहे. ही स्पर्धा मंडळाच्या केळकर-भोपटकर हॉलमध्ये होणार आहे.
ही स्पर्धा 13, 15, 17 वर्धांखालील मुला-मुलींमध्ये एकेरी गटात होणार असून 40 वर्षांवरील पुरुष गटांत दुहेरीत स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला पुणे जिल्हा व मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेची मान्यता आहे.