कबड्डी लीगमध्ये पिंपरी चिंचवडची आगेकूच

पुणे – पिंपरी चिंचवड संघाने खेड संघावर 35-32 असा निसटता विजय नोंदविला आणि जिल्हा कबड्डी लीगमधील महिलांच्या विभागात आव्हान राखले. पुरुष विभागात शिवनेरी जुन्नर संघाने छावा पुरंदर संघाला 35-21 असे पराभूत केले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुष विभागात सहावा सामना शिवनेरी जुन्नर संघाने 18-12 अशी आघाडी घेतली होती. शिवनेरी जुन्नर संघाच्या पवन कारंडे याने 4 गुण, 1 बोनस व 2 पकडी घेत 7 गुण मिळविले. मयुर तांबोळीने 4 गुणांसह 2 बोनस व 1 पकड घेत 7 गुण घेतले. तर मनोज बोंद्रे याने 4 पकडी केल्या. पुरंदर संघाच्या चेतन थोरात याने 1 गुणांसह 3 बोनस व 2 पकड घेत 6 गुण मिळविले. अनिकेत रोडे याने 4 गुण मिळविले. तर सुदर्शन घुले याने 3 पकडी घेत चांगली लढत दिली.

महिला विभागातील सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने मध्यंतराला 19-13 अशी आघाडी मिळविली होती. पिंपरी चिंचवड संघाच्या तेजल पाटील हिने उत्कृष्ट चढाया करीत 9 गुण मिळविले. पूनम तांबे व हर्षदा सोनवणे यांनी प्रत्येकी 6 गुण मिळविले. खेड संघाच्या तृप्ती लांडगे हिने उत्कृष्ट खेळ करीत 15 गुण मिळविले. तर अंजली मुळे व अमृता तमुचे यांनी प्रत्येकी 2 गुण मिळवित चिवट लढत दिली. बलाढ्य बारामती संघाने पुणे संघावर 37-36 असा विजय मिळविला.

या सामन्यात मध्यंतराला बारामती संघाकडे 16-13 अशी आघाडी होती.त्यांच्या आदिती जाधव व प्रतिक्षा कारेकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत विजय मिळवून दिला. आदिती जाधव हिने 9 गुणांसह 3 पकडी घेत 13 गुण मिळविले. तर प्रतिक्षा कारेकरने 11 गुण मिळविले. पुणे संघाच्या मानसी सावंत हिने 12 गुणांसह 5 पकडी घेत 17 गुण मिळविले. तर श्रध्दा चव्हाण हिने 14 गुण मिळवून चांगली लढत दिली मात्र त्यांची ही लढत अपुरी ठरली .

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)