जिल्ह्यात 2 मिमी पावसाची नोंद

नगर – हावामान खात्याने वर्तवलेल्या आंदाजानुसार जिल्ह्यात ठिक-ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पारनेर तालुक्‍यात 19 मिलीमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ कोपरगाव, शेवगाव, राहुरी तालुक्‍यात वादळी पावसाचा शिडकाव पडला. जिल्ह्यात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ंमगळवार रोजी देखील वातावरण असेच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नाशिक, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळांसह पावसाची शक्‍यता हावामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.
विजांचा कडकडाटसह पारनेर तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याध्ये 19 मिलीमीटर पाऊस हा पारनेर तालुक्‍यात पडला आहे. तर राहुरी व शेवगाव तालुक्‍यात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोपरगाव तालुक्‍यात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नगरशहरासह अनेक तालुक्‍यात मेघगर्जनेसह सोमवारी वादळाने दाणादाण उडविली. या बेमोसी पावसाने कांदा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आज मंगळवार रोजी देखील वातावरण असेच राहील, असा इशारा हवान विभागाने दिला असून नागरिकांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.