नगर – भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत नगर शहराबरोबर स्वच्छ शासकीय कार्यालय अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या कार्यालयास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे वितरण नुकतेच महापालिकेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर शहरातील जिल्हा न्यायालय ही अत्यंत भव्य इमारत आहे. जिल्हा न्यायालयामध्ये विविध खटल्यांच्या कामासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी आपली इमारत स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले. प्रत्येकाला स्वच्छतेचा संदेश देत इमारतीला स्वच्छ व सुंदर म्हणून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते जिल्हा प्रबंधक सी.के. तरडे, न्यायलयीन व्यवस्थापक बी. कृपावरम्, अधीक्षक आर. यु. शेख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, सुनील पवार, नगरसेवक मनोज कोतकर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अभियंता परिमल निकम, व्ही. जी. सोनटक्के उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, स्वच्छता अभियान हे लोकचळवळ व्हावी.