पुणे – न्यायालयात दाखल होणारे आणि प्रलंबित तत्काळ स्वरुपाचे दावे लवकर निकाली लागावे म्हणून 21 सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबत नुकतेच परिपत्रक काढले.
सर्व न्यायाधीशांच्या उपस्थित मंगळवारपासून (दि. 15) येथील कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आता टप्प्याटप्याने कामकाजास गती देण्यात येणार आहे.
दोन शिफ्टमध्ये कामकाज होणार असले तरी महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवरच सुनावणी होणार आहे. एखाद्या शहरात दोन शिफ्टमध्ये काम करणे शक्य नसेल, तर त्याची पूर्वकल्पना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाला द्यावी, असे परिपत्रकात नमूद आहे.