जिल्हा सहकारी बॅंकेकडून सेवा संस्थांना दिलासा

आकारण्यात येणारे व्याज माफ करण्याचा घेतला निर्णय
सहा महिन्यांच्या व्याजाचा पडणार होता संस्थांवर बोजा
शेवगाव, (प्रतिनिधी) – महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत द्यावयाच्या कर्जमाफीच्या याद्या तयार करून मार्चमध्ये प्रत्यक्ष कर्जमाफी होण्याच्या कालावधीपर्यंतच्या पाच महिन्यांचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आकारण्य खत येणारे व्याज अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या संस्थांना दिलासा मिळाला आहे.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यावेळी सर्व गावोगावच्या सेवा सहकारी संस्थांनी नोव्हेंबर अखेर व्याज आकारणी करून शेतकऱ्यांची थकबाकी शासनाला कळविली होती. मात्र प्रत्यक्षात मार्चमध्ये कर्जमाफी होऊन आलेली रक्कम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी जिल्हा सहकारी बॅंकेकडे वर्ग केली. मात्र मार्चमध्ये वसूल मिळाल्याने बॅंकांनी मार्च अखेरपर्यंत व्याज आकारणी केली होती. जिल्हा सहकारी बॅंकांना नोव्हेंबरअखेर संबंधित शेतकऱ्याच्या नावे कर्जाची व्याज वसुली मिळाली. तथापी पुढील सहा महिन्याच्या कालावधीतील व्याजाच्या रकमेचे काय करायचे हा प्रश्‍न अनुत्तरीत होता.

त्यामुळे सेवा सहकारी संस्था विवंचनेत होत्या. तालुक्‍यातीत मुंगी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र ढमढेरे यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निर्णयामुळे येथील सर्वच सेवा सहकारी संस्थाना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांचीही मदतीची भूमिका
असाच सुखद निर्णय राष्ट्रीयकृत बॅंकानीही घेतला असल्याची माहिती शेवगाव तालुका राष्ट्रीयकृत बॅंकेचे नोडल अधिकारी तथा येथील सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी अमोल हात्ते यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.