सिद्धीविनायक ग्रुपकडून शिव जयंतीच्या पुर्वसंस्थेला उबदार ब्लॅंकेटचे वाटप

- सेवेकरी, आरोग्य रक्षक, सुरक्षा रक्षक यांचा सन्मान -

धनकवडी – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कात्रज येथील सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यविषय जनजागृती, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियमांचे पालन त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांनी ग्रुपच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. तर पूर्व संध्येला पुणे रेल्वेस्थानकावरील बेघरांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हे वाटप पोलीस अधिक्षक(लोहमार्ग) सदानंद वायसे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक उपायुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, यांच्या हस्ते शुक्रवारी शिव जयंती निमीत्त आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पत्रकार, स्मशानभूमीत काम करणारे सेवेकरी, आरोग्य रक्षक, सुरक्षा रक्षक यांचा सन्मान करण्यात आला. तर सकाळी अनाथ अश्राम व वृद्धाश्रमाला मदत देण्यात आली.

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त सागर पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करताना त्यांचे दैदिप्यमान कार्य आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी वाटचाल केली पाहिजे असा सल्ला देत सिद्धीविनायक ग्रुप करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.तत्पूर्वी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कडाक्‍याच्या थंडीत रेल्वे स्थानकावर कुडकुडत रात्र काढणाऱ्या अनाथ, गरजूंना पोलीस अधीक्षक (रेल्वे) सदानंद वायसे यांचे हस्ते उबदार ब्लॅंकेट तसेच रस्त्यावर बेवारसपणे फिरणाऱ्या नागरिकांना जेवण देण्यात आले.

अँड. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न झाला.उत्सवामध्ये होणारे पाश्‍चात्य संस्कृतीचे दर्शन याला छेद देत सिद्धीविनायक ग्रुप पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी ग्रुपच्यावतीने सुरज बरदाडे, प्रथमेश देशमुख, अक्षय खुटवड, हर्षल मुळे, उत्कर्ष गाडे, अनिकेत पवार, शुभम शिंदे, शुभम बरदाडे आदी सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.