औंध, दि. 1 (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे सचिन मानवतकर यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त औंध तसेच बालेवाडी परिसरातील महिलांना साडी वाटप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार “हर घर तिरंगा’ या मोहिमेंतर्गत तिरंगा ध्वजदेखील भेट देण्यात आला.
शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, रवींद्र साळेगावकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, उमा गाडगीळ, योगेश जुनवणे, गणेश कलापुरे यांच्या हस्ते सर्व साडी व तिरंगा वाटप करण्यात आले.
सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, सचिन मानवतकर यांनी अत्यंत कमी वेळात चांगल्या प्रकारे सामाजिक कामांमध्ये आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या या सामाजिक कामांची नक्कीच दखल घेतली जाईल. यावेळी गणेश बगाडे, संजय निम्हण, सूरज गायकवाड, रमेश ठोसर तसेच औंध, बालेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.