आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना बियाणे वाटप

सांगवी – मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ज्वारी व हरभरा बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले.

“जय जवान, जय किसान बियाणे दान’ या उपक्रमाचा शुभारंभ बब्रुवान वाघ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र महाराज मोरे, नगरसेवक सचिन रोचकरी, पंचायत समिति सदस्य दत्ता शिंदे, अरुण पवार, नितीन चिलवंत, शिवकुमारसिंह बायस, किरण चौधरी, संजय सुर्यवंशी, शिवाजी सुतार, अजीज सिद्धीकी, राजेश गाटे, विशाल डांगे, प्रभाकर उळेकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.