साप येथील कृषी बचत गटांना बी-बियाणांचे वाटप

मसूर (प्रतिनिधी) –साप, ता. कोरेगाव येथील प्राधान्य कुटुंबाच्या 207 लाभार्थींना मोफत धान्य वाटप करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा विकास कार्यक्रमांतर्गत कृषी बचत गटांना तूर वाटप व बंधावर खते पोहोच वाटप कार्यक्रम पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, धमणेरचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, तहसीलदार रोहिणी शिंदे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने उपस्थितीत होते.

ना. पाटील म्हणाले, करोनामुळे लोकांना रोजगार नाही. उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांना धान्य वाटप केले पाहिजे, या दृष्टीने शासनाने प्रयत्न केला. यावेळी सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कदम यांनी केले व आभार नागेश अडसूळे यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.