औंध, दि. 9 (प्रतिनिधी) -कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त औंध परिसरातील शंभर विद्यार्थ्यांना कैलास गायकवाड यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. गायकवाड नगर येथील कैलास गायकवाड यांच्या निवासस्थानी पुणे शहरातील अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी स्थायी समिती माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे, अशोक मुरकुटे, तानाजी चोंधे, शहाजी रानवडे, गणपतराव बालवडकर, विशाल विधाते, अदिती गायकवाड कडू (पाटील), जीवन चाकणकर, निलेश जूनवणे, नंदलाल धिवार, विनोद रणपिसे, रमेश ठोसर, निवृत्ती कलापुरे, बाळासाहेब कलापूरे, स्नेहल बांगर तसेच औंध-बाणेर-बालेवाडी-बोपोडी परिसरातील अनेक नागरिकांनी माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.