हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मंगलबाई निरगुडे यांनी स्व. बबनराव निरगुडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले. वर्ग पहिले ते वर्ग तिसरी पर्यंतच्या मुला मुलींना दप्तराचे वाटप केले.
दर वर्षी मंगलाबाई निरगुडे ह्या आपल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलांना दप्तराचे वाटप करतात. स्व .बबनराव निरगुडे यांचे दोन्ही मुले शासकीय नोकरी मध्ये आहेत. एक मोठा मुलगा योगेश निरगुडे (I .A S .)अधिकारी आहेत व दुसरा मुलगा कैलास निरगुडे (S .T .I ) मध्ये आहेत.
आज जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण झाल्यावर शाळेतील विध्यार्थी यांनी भाषण केले व काही विध्यार्थी यांनी देश भक्ती वर गिते गाईले. हा सर्व कार्यक्रम झाल्यावर मुला मुलींना दप्तर वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष रवि शिरसागर, सरपंच पूजा अमोल मस्के, पत्रकार शिवशंकर निरगुडे, गजाननराव गायकवाड, भारत निरगुडे, भारत वाकळे, जितेंद्र ईरतकर, मुख्याध्यापक मोरे, बोराडे सर, कावरखे सर, छोटे सर, कपटकर सर, अंगणवाडी सेविका रंजनाबाई इंगळे, आशा वर्कर रेणुका गायकवाड यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.