सुर्योदय फाऊंडेशन व भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम
कोथरुड : सुर्योदय फाऊंडेशन आणि भाजपा युवा मोर्चा कोथरुडच्या वतीने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोथरुड कर्वेनगर परिसरात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. शासन नियमांचे पालन करत हा उपक्रम राबविण्यात आला. त्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिस बांधवांमध्ये सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
आमदार व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन फोलाने यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी सोपान सरडे, माधव कांगने, सुभाष साळुंके, महादेव आंबेकर, आदी उपस्थित होते.