पुणे – इंदापूर शहरात रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या माध्यमातून दूध वाटप करण्यात आले.
इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक, कसबा, सरस्वती नगर मस्जिद या भागातून सुमारे 7 हजार बांधवांना दूध वाटप करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरी होणारी रमजान ईद यावर्षी सर्व बांधव घरोघरीच साजरी करणार असल्याने, प्रत्येकासाठी सणानिमित्ताने ही भेट प्रवीण माने यांनी सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, बाळासाहेब ढवळे, इम्रान शेख, आयाज शेख, समीर पठाण, बशीर भालदार, आझाद पठाण, दत्तू भिसे, खाजाभाई बागवान, फकिर पठाण, शकीलाल पठाण, युनिस देशमुख, मोहम्मद मौलाना, अलीम काझी, फकीर पठाण उपस्थित होते.