रेडा (प्रतिनिधी) – बावडा – लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ व गरजू नागरिकांना करोना पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन सी व डी गोळ्यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बावडा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संपूर्ण बावडा-लाखेवाडी गटातील ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना या रोगप्रतिकार शक्ती वाढणणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल वाघमारे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.