वाघोली (प्रतिनिधी) – टीम फेब फाउंडेशन मुंबई व अर्थ सोशल फाउंडेशन वाघोली आणि दादासाहेब सातव पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आव्हाळवाडी तालुका हवेली येथील गरीब गरजूंना अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले.
पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब बबनराव सातव पाटील, आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सुरेखा दादासाहेब सातव पाटील, आव्हाळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल सातव यांच्या हस्ते देण्यात पन्नास गोरगरीब, गरजूंना मोफत अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवछत्रपती मित्र मंडळ वडजाई चे अध्यक्ष अक्षय सातव पाटील, रोहिदास कामठे, निलेश सातव, बाळासाहेब टेमगिरे, संदिप नाना सातव आदी मान्यवर उपस्थित होते.