नगर -सावेडी उपनगरासह नगर-औरंगाबाद रस्त्यावरील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नगर शहर कॉंग्रेस आणि किरण काळे मित्र मंडळाच्या वतीने 200 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. करोनाच्या महामारीने सध्या जगभर थैमान घातले आहे. याचा राज्यासह जिल्ह्यात देखील मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17 पेक्षा जास्त नागरिकांना करोनाची लागण झाली आहे.