पिरंगुट -येथील ग्रामपंचायत पिरंगुट व पिरंगुट व्यापारी असोसिएशनच्या वतीने गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले. कातकरी समाज, आदी कुटुंबांना मदत करण्यात आली. या प्रत्येक कुटुंबाला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो तूर डाळ, 1 किलो तेल, 1 किलो साखर, अर्धा किलो मीठ, चहा पावडर आणि 2 साबण देण्यात आले.
यावेळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सरपंच चांगदेव पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, ग्रामविकास अधिकारी भोजने, उपसरपंच प्रविण कुंभार, माजी उपसरपंच रामदास गोळे, वातुंडेचे सरपंच अमोल शिंदे, बावधनचे माजी सरपंच निलेश दगडे उपस्थित होते.