मानवता प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप 

कात्रज : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण पुणे शहर लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आपण प्रशासनाचे सर्व नियम पाळत असालच.

मात्र पोटाचे प्रश्न लॉकडाउन करता येत नाही. आजही शेकडो लोक पुण्यात अडकले आहेत. त्यांची उपासमार होत आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करणे आपले कर्तव्य आहे. हातावर पोट असलेल्या अनेक मजूरानां सध्या घरात बसण्याची वेळ आली आहे. शहरात लॉकडाउन असल्यामुळे  गरिबांना उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडला आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस आणि जेष्ठ पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली मानवता प्रतिष्ठानच्या कात्रज, यांच्या वतीने 100 परिवारांना  पो.निरिक्षक  वसंत कुवर यांचे हस्ते जीवनावश्यक वस्तूचे वाटप  करण्यात आले. नागरिकांना जीवनाश्यक वस्तूची गरज असल्यास मानवता प्रतिष्ठानाशी संपर्क साधावा असे अवाहन  करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना मदत कराची असल्यास त्यांनी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधाव.

ही मदत नव्हे तर आपली जबाबदारी आहे; असे आव्हान मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास नाना फाटे यांनी यावेळी केले. यावेळी विनितेश फाटे, साई समर्थ ग्रुपचे प्रशांत फाटे, शंकर निंबाळकर,अतुल फाटे,जयवंत होडगे,सारंग फाटे आणि साईनाथ मित्र मंडळाचे महेश जाधव ,संकेत फाटे,अथर्व फाटे यांनी सर्व नियोजन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.