रोहित पवार यांच्यातर्फे 100 शाळांना डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह पॅनेलचे वितरण

जामखेड – मतांसाठी माणसे नव्हे, तर उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडविण्यासाठीच्या कामाचा हा प्रारंभ आहे. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात 100 शाळांना डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह पॅनेलचे वितरण करण्यात आले असून उर्वरित शाळांनाही लवकर संच वाटप करणार असल्याचे युवा नेते रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

पवार यांच्या पुढाकारातून जामखेड येथील 100 जिल्हा परिषद शाळेनं डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह पॅनेलचे वितरण कार्यक्रम शहरातील महावीर भवन येथे झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले, विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, बारामती ऍग्रोचे सुभाष गुळवे, बाजार समितीचे संचालक संजय वराट, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, उघोजक रमेश आजबे, प्रदीप पाटील, अंकुश उगले, अमोल गिरमे, जमीर बारूद नगरसेवक दिंगबर चव्हाण, पवन राळेभात, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, कैलास हजारे, काकासाहेब कोल्हे आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

पवार म्हणाले, समाजातील मूलभूत प्रश्न सोडवत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी मदत केली, तरच ते पुढे नोकरी, उद्योग, व्यवसायात यशस्वी होतील. शिक्षणात काटकसर केली जाणार नाही. राजकारण राजकारणाच्या जागी करू मात्र, शिक्षणाच्या बाबतीत काटकसर केली जाणार नाही. 40 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना हे संच देण्यात आले असून या एका संचाची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे.

आतापर्यंत अनेक शाळांना ई-लर्निंगची कीट देण्यात आली आहेत. मात्र डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह पॅनेलचे किट पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आले आहे. या पॅनेलमध्ये 200 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आली, असून विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. या माध्यमातून मुले अधिक बौद्धिक प्रगती साधू शकतील असे संच खासगी शाळांमध्येही नसल्याने खासगी शाळांपेक्षा मराठी शाळा अधिक चांगल्या होतील याकडे आपण सर्वजण लक्ष देऊ, असे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.