वाल्हे, (वार्ताहर) – नावळी (ता.पुरंदर) येथील श्री पद्मावती एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळा असणार्या छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल संकुलास जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून, संगणक प्रयोगशाळा आणि सीसीटीव्ही साहित्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले.
डॉ. दुर्गाडे यांच्या हस्ते तसेच हॅकल लॉक टाइट कंपनीचे एच.आर. हेड गोविंद पवार व तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष संदेश पवार यांच्या उपस्थितीमध्ये संगणक प्रयोगशाळेचे आणि सीसीटीव्हीचे लोकार्पण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे अध्यायन, रंजक पद्धतीने होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने धर्मदाय निधीमधून 50 हजार रुपये शाळेला प्रदान करण्यात आलेली होती.
या रकमेतून श्री पद्मावती एज्युकेशन सोसायटीच्या संचालक समितीने संस्थेच्या नावळी या ठिकाणी असणार्या पूर्व प्राथमिक शाळेस ही रक्कम संगणक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला होता.यासाठी, संस्थेचे सचिव श्रीकांत पवार यांनी मार्गदर्शन केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका प्रियंका पवार,सुप्रिया मस्के, हेमांगी कोळेकर, प्रतीक्षा खलाटे,धनश्री जाधव, कोमल भोसले,निशा लेंडे,क्रिडा शिक्षक प्रदीप खेडेकर, कराटे प्रशिक्षक अशोक शिंदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपा परगणा प्रमुख सुनील राजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते अतुल पवार, यश ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष यशराज जगताप, नवनाथ रनवरे आदींसह ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप पवार यांनी तर संस्थेचे अध्यक्ष संभाजीराजे गरुड यांनी आभार मानले.