राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक ऍड. गणेश सांडभोर यांच्या वतीने कोविड प्रतिबंधक आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करण्यात आले.
राजगुरूनगर येथील शिवसेना कार्यालयात पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते.
यावेळी माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, उपतालुका प्रमुख दिलीप तापकीर, तुषार सांडभोर, बाबा इनामदार, कैलास गोपाळे, अजिंक्य गाडे, अक्षय कौदरे व शिवसैनिक उपस्थित होते.