पुणे – व्यावसायिक भागीदार आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वास्थ्यासाठी “कार्ल्सबर्ग इंडिया’ने 10 लाख सॅनिटायझिंग वाईपचे वितरण करण्याचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कार्ल्सबर्गने खास सॅनिटायझिंग वाईप तयार करून आपल्या रिटेल विक्रेत्यांना हे वाईप ग्राहकांना देण्याची सूचना केली आहे. या वाईपमुळे दुकानांत वस्तू हाताळताना आणि विकत घेताना करोना संसर्ग रोखता येईल.
कार्ल्सबर्ग इंडियाने महाराष्ट्रासह आठ राज्यांतील 4 हजारांहून जास्त आउटलेटमध्ये हे वाईप उपलब्ध केले आहेत.
कार्ल्सबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केटिंग व्हाइस प्रेसिडेंट पार्थ झा म्हणाले, आमचे ग्राहक आणि उपभोक्ते यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आमची साधने वापरणे, ही काळाची गरज आहे. या उपक्रमातून त्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देणे हा उद्देश आहे.