अजय-रोहितच्या मैत्रीत दुरावा?

रोहित शेट्टीने रणवीर सिंहसोबतच्या “सर्कस’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. यात जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडेही झळकणार आहे. रोहित शेट्टी हा चित्रपट रणवीरसोबत करणार असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात होते. परंतु बॉलीवूडमधील काही लोकांच्या मते, रोहित हा आगामी चित्रपट आपला खास मित्र अजय देवगन सोबत करणार होता. परंतु तसे झाले नाही.

यामुळे बॉलीवूडमध्ये अशी चर्चा रंगू लागली आहे की, रोहित आणि अजय यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. या दोघांमध्ये थोडीसी अनबन सुरू आहे. रोहित आता अजय ऐवजी अन्य कलाकारांसोबत जास्त काम करत आहे.

रोहितने त्याचा मागील रिलीज झालेला “सिंबा’ चित्रपट रणवीर सिंहसोबत केला होता. त्यापूर्वी “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत काम केले आणि 2017 मध्ये त्याने अजय देवगनसोबत “गोलमाल अगेन’ चित्रपटाची निर्मिती केली होती.
रोहितने 2013 पूर्वी आपला प्रत्येक चित्रपट अजयसोबत केला होता. “चेन्नई एक्‍सप्रेस’मध्ये रोहितने पहिल्यांदा अजयला डावलत शाहरुख खानसोबत चित्रपट साकारला होता. विशेष म्हणजे, शाहरुख आणि अजय यांच्यातील संबंध जास्त चांगले नाहीत.

रोहित आणि अजय यांची जोडी ही सुपरहिट चित्रपटाची हमी मानली जात होती. परंतु काही वर्षांपासून रोहितने अन्य कलाकारांसोबत चित्रपट साकारण्याचा धडाका लावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.