नगर – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन अहमदनगर शाखेच्यावतीने सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की बुधवार दि, 8 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या संपामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन राज्य संघटनेचा सहभाग नसल्याने अहमदनगर शाखा संपात सहभागी होणार नाही.
नव्यानेच सरकार स्थापन झाल्याने अद्याप पर्यंत सरकारच्या माननीय मंत्री महोदय समवेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी बाबत व प्रलंबित प्रश्न बाबत चर्चा झालेली नाही. जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ने याबाबत माननीय मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरावरील प्रलंबित प्रश्न बाबत सविस्तर निवेदन दिलेले असून याबाबत नवीन मंत्री महोदयांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याने बुधावर दिनांक 8 जानेवारी 2020 मध्ये संपात सहभागी होणे उचित नसल्याने जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संपात सहभागी होणार नाही.
याची नोंद सर्व कर्मचारी यांनी घ्यावी अशी माहिती सुभाष कराळे राज्य उपाध्यक्ष,श्री.राजेंद्र म्हस्के राज्य सहसचिव, विकास साळुंखे जिल्हाध्यक्ष,राज्य समन्वयक-एम पी कचरे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य-शशिकांत रासकर, कार्याध्यक्ष- भारत बोरुडे व सुनिल सरोदे, सचिव- किशोर शिंदे, माजी अध्यक्ष-विजय कोरडे, संघटक- सौ भारती सांगळे,सुनील जाधव, शिवाजी भिटे यांनी दिली आहे.