मुंबई – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची शिफारस यंदा अर्जुन पुरस्कारासाठी न केल्याने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक सदस्यांनी बुमराहची शिफारस करण्याची केलेली मागणी उच्च पदस्थ व्यक्तींनी गांभीर्याने घेतली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात येत आहे.
“यॉर्कर किंग’ अशी सार्थ बिरुदावली मिरविणारा बुमराह यंदा या पुरस्कारासाठी निश्चितच दावेदार होता. मात्र, मंडळातीलच काही सदस्यांनी अन्य खेळाडूंची नावे पुढे केल्याने आणखी एका नावाची शिफारस करण्यावर मर्यादा आली आहे. गेल्या 3 मोसमांत बुमराहची कामगिरी अव्वल दर्जाची झालेली असली तरीही त्याच्या नावाला प्राधान्य दिले गेले नाही याबाबत मंडळातीलच काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.