बाधित वाढले, राज्यात पुन्हा लॉकडाउन?

पुणे – नागपूर, ठाणे, पुणे, मुंबई, अमरावतीत करोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन होईल की काय, अशी स्थिती उद्‌भवली आहे. बाधित पुन्हा वाढत असल्याने संशयितांच्या टेस्ट वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.त्यासाठी स्वॅब कलेक्‍शन केंद्रही वाढवले असून, त्याठिकाणी जास्तीत जास्त चाचण्या करण्यात येत आहेत.

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क होत लॉकडाऊनमधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विवाहांना फक्त 50 जणांचीच उपस्थिती, हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर अशा अनेक निर्बंधाचा त्यात समावेश आहे.

जर आस्थापना तसेच मंगल कार्यालयांनी नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड वसूल करावा. जर दुसऱ्या वेळेस संबधित मंगल कार्यालये, हॉल अथवा आस्थापनांकडून अशा प्रकारचे नियमांचे उल्लंघन झाल्यास 15 दिवस सील करण्याची कार्यवाही करोन संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून पहिल्या वेळी 500 रुपयांचा दंड व पुन्हा आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हे सर्व आदेश तात्काळ लागू करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.