पालघर – एका रूग्णाच्या बिलावरून झालेल्या वादानंतर एका जमावाने रूग्णालयावर हल्ला करून वैद्यकीय सुविधेची तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात रूग्णालय प्रमुख गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सदर रूग्णालय बोईसर परिसरात आहे. काल तेथे अचानक सुमारे 20 ते 25 जण घुसले, त्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला आणि वैद्यकीय सुविधेचे नुकसान केले.
बिल कमी करण्याच्या वादातून हा प्रकार घडला. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. स्वप्नील शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शेजारील गुजरातमधील वापी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी रूग्णांच्या हॉस्पिटलच्या बिलात कपात करण्यासाठी सतत दबाव आणत असल्याची तक्रार केली आहे.