माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतातच. पण आता अमृता फडणवीस प्रकाशझोतात येण्याचं कारण काहीसं वेगळं आहे. अमृता अनेकदा सोशल मिडियावर गाण्यामुळे चर्चेत असतात.
त्यांनी भाऊबीजचं निमित्त साधत ‘तिला जगू द्या’ हे गाणं अमृता यांनी सादर केलं आहे. हे गाणं महिला आणि मुलींना समर्पित आहे. टी- सीरीज मराठी ने या गाण्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या गाण्याला 44,000 डिसलाईक्स मिळाले आहेत. तर 6,600 लाईक्स मिळाले आहेत.
‘आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे- तिला शिकू द्या जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. हे कॅप्शन देत अमृता यांनी हे गाणं युट्युबवर पोस्ट केलं होतं.