अवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गावठाण आणि वाडीवस्तीवर करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून गावात औषधांची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती सरपंच संगीता शिंदे यांनी दिली.
देशात ओढवलेल्या करोनाचा सामना करण्यासाठी व जनजीवन सुस्थितीत आणण्यासाठी अवसरी खुर्द आणि वाडीवस्तीवर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करणायत येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामपंचायतीच्या वतीने गावात आणि परिसरात औषधांची फवारणी करून गावातील परिसर निर्जंतूक करण्यात येत आहे.ग्रामपंचायत तसेच आरोग्य प्रशासन यांच्यामार्फत
ग्रामस्थांना करोना विषाणूमुळे होणाऱ्या गंभीर साथीच्या आजाराबाबत गावामध्ये फलकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनीही स्वच्छतेविषयी जागरूकता बाळगून दैनंदिन जीवनात त्याचा अंगीकार करावा तसेच आपल्या सभोवताली पुणे, मुंबई तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.