नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे टूलकिट प्रकरणात बंगळुरू येथील 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली सत्र न्यायलयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणअचा तपास क्षुल्लक आणि ताणलेला असल्याचे निरीक्षणही न्यायलयाने नोंदवले.
एक लाख रुपयांच्या दोन जामीनदारामवर दिशाला अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र राणा यांनी जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा झालेला किरकोळ आणि ताणलेला तपास पाहता मला जामीन मंजुर करण्यात कोणतीही अडचण आहे असे मला वाटत नाही. या मुलीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असे न्यायालयाने नमूद केले. मुख्यमहानगर दंडाधिाकरी पखज शर्मा यांच्या न्यायलयात पोलिसांनी रवीला हजर केले. त्यांनी तिला चार दिवस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, तिला जामीन मंजूर झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा अर्ज फेटाळण्यात आला.
रवीला तिच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.त्यावेळी तिला एक दिवसीय पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांचा रिमांड आज संपत होता. न्यायाधिशांनी नमूद केले की, तिच्यावर द्वेष पसरवणे, प्रिती पसरवणे ते भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणे अशा आरोपांचा त्यात समावेश आहे. रवीची तिच्या सहआरोपींसोबत चौकशी करणे आणि त्यातून त्याची चौकशी करून यातील प्रत्येकाचा सहभाग निश्चित करणे, नि:पक्ष तपासासाठी आवश्यक आहे.
तत्पुर्वी, ऍडव्होकेट निकिता जेकब, अभियंता शंतनु मुळुक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांची टूलकीट प्रकरणात सोमवारी एकत्रित चौकशी करण्यात आली. जेकब आणि मुळुक यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या द्वारका येथील सायबर सेलच्या कार्यालयात ही आज पुन्हा चौकशी करण्यात आली.
ग्रेटा थनबर्ग हीने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता. त्यासाठी वापरलेल्या टूलकिट संदर्भात बंगळुरू येथील कार्यकर्ती दिशा हिला अटक करण्यात आली. तर निकिता जेकब आणि शंतनु मुळूक यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. “जेकब आणि मुळूक यांना यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. टुलकिट बनवण्यातील त्यांच्या सहभागाची चौकशी करण्यात आली’, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
जेकब आणि मुळूक यांना प्रवासी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनु मुळीकने दिल्ली न्यायलयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावर उद्या अतिरिक्त सत्र न्यायदिश धर्मेंद्र राणा यांच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत रवी या प्रकरणाची सर्व जबाबादारी सहआरोपींवर टाकली. मुळुक आणि जेकब चौकशीसाठी सोमवारी आले. मात्र त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पुरावे काय?
दिशा रवीला जामीन मंजूर करण्यापुर्वी अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र राणा यांनी खलिस्तानवादी चळवळ आणि दिशा रवी यांच्या संबंधाबाबत काही पुरावे आहेत का? अशी विचारणा केली. वाईट पार्श्वभूमी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मी एकदा भेटलो तर माझाही हेतू तोच होता असा शिक्का तुम्ही कसा मारू शकता? जर मंदिराच्या देणगीसाठी मी एखाद्या दरोडेखोराला भेटलो तर मी दरोड्यात सहभागी झालो असे होईल का? असे विचारून पोएटिक जस्टीसवर नाही बंदी घातली आहे ना त्याच्या संस्थापकांवर कोणताही गुन्हा नोंदवला आहे, याकडे न्यायाधिशांनी लक्ष वेधले.