बॉलीवूड व्यतिरिक्त आपल्या वर्कआऊटबद्दलही दिशा पटणी खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. या फोटोसेशनमुळे तिला शेकडो फॅन्सही मिळाले आहेत. तिच्या एनर्जिटिक लुकमध्ये तिच्या वर्कआऊटचा मोठा वाटा आहे.
असाच आपल्या वर्कआऊटचा आणखी एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. त्यातून ती आपल्या व्यायामावर किती कष्ट घेत असते, हे दिसून येते. या व्हिडिओमध्ये ती फुल रेंज स्क्वॉट करताना दिसते आहे. एवढेच नव्हे, तर 75 आणि 80 किलो वजन उचलून तिने हे स्क्वॉट केले आहे.
व्यायामाच्या वेळी तिच्या खांद्यावर 80 किलो वजन ठेवलेले होते. एका सुसज्ज जिममध्ये तिचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे आणि त्याला लाईकही भरपूर मिळाले आहेत.
टायगर श्रॉफची मम्मी आयेशा श्रॉफ यांनीही या व्हिडिओवर “अमेझिंग दिशा’ अशी कॉमेंट केली आहे. अवघडातील अवघड एक्सरसाईज करण्याचे इतर अनेक व्हिडिओ दिशाने यापूर्वीही शेअर केले होते. तेंव्हाही त्याला असेच लाईक मिळाले होते.