कबीर सिंह च्या यशानंतर अभिनेता शाहिद कपूरकडे अनेक बिग बजेट चित्रपटांचे प्रोजेक्ट्सची लाइन लागली आहे. तो आता दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या आगामी “योद्धा’ चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. हा चित्रपट करण जोहर द्वारा प्रोड्यूस करण्यात येणार आहे. यात शाहिद कपूरसोबत पहिल्यांदाच दिशा पटनी मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाची आतापासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ऍक्शन पॅक्ड चित्रपट असणार आहे. यात शाहिदसह दिशाच्याही जबरदस्त ऍक्शन सीन्स पाहण्यास मिळणार आहे.
या चित्रपटासाठी निर्मात्यांना असा कलाकार हवा होता जो ऍक्शन आणि रोमॅंटिक असे दोन्ही सीन्स करू शकेल. यावर खूप विचार केल्यानंतर अखेर निर्मात्यांनी दिशा पटनीचे नाव निश्चित केले. त्यानंतर दिशाला चित्रपटासाठी साइन करून घेण्यात आले आहे.
दरम्यान, या चित्रपटाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दिशा ही प्रथमच धर्मा प्रोडक्शनच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. शाहिद कपूर आणि दिशा पटनीची जोडी पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाची आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे.