मुंबई – दिशा पटणीने सोमवारपासून “एक व्हिलन रिटर्न्स’ या आपल्या आगामी सिनेमाचे शूटिंग सुरू केले. या सिनेमाच्या व्हॅनिटी व्हॅनमधील एक फोटोही तिने शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने एक ब्लॅक जॅकेट घातलेले आहे आणि ती पाठमोरी उभी आहे.
View this post on Instagram
तिच्या जॅकेटवर “एक व्हिलन रिटर्न्स’ ही अक्षरे ठळक अक्षरात लिहीलेली दिसून येत आहेत. जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि दिशा पटणी एवढी मंडळी या सिनेमात असणार आहेत. “एक व्हिलन रिटर्न्स’ची चर्चा गेल्या वर्षीपासूनच सुरू झाली होती.
View this post on Instagram
त्यामध्ये तारा सुतारिया सोबत आदित्य रॉय कपूर असणार असे समजले होते. मात्र नंतर कालांतराने आदित्य रॉय कपूरच्या जागेवर अर्जुन कपूरची निवड निश्चित झाली. 2014 मध्ये रिलीज झालेल्या “एक व्हिलन’चे डायरेक्शन मोहित सुरीने केले होते. गॅंगस्टरच्या रोलमधील सिद्धार्थ मल्होत्रा हा श्रद्धा कपूरच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते.
View this post on Instagram
मात्र त्याला प्रेरणा देणाऱ्या या मुलीचा खून होतो आणि गॅंगस्टर तिच्या खुन्याच्या शोधात बाहेर पडतो, अशी पहिल्या सिनेमाची कथा होती. आता त्याच्या सिक्वेलमध्ये आणखीन थोडा वेगळा मालमसाला वापरलेला असणार आहे. कदाचित पूर्वीच्याच कथेला या सिक्वेलमध्ये पुढे सुरू चालू ठेवले जाऊ शकते.
View this post on Instagram