‘तो’ जे स्टंट करतो तसे, दुसरे कुणीच करू शकत नाही – दिशा पटानी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. जरी दिशा पटानी नेहमीच टायगर श्रॉफला तिचा एक चांगला मित्र म्हणून वर्णन करत असली तरी ते दोघे नेहमीच एकत्र पहायला मिळतात. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर एकत्र व्हायरल झाले आहेत. यावेळी एका मुलाखतीमध्ये दिशाने टायगरचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

1 day to go @tigerjackieshroff ❤️❤️ #baaghi2on30march

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

मुलाखतीमध्ये दिशाला काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बॉलीवूडमधील तिचा आवडता अ‍ॅक्शन हिरो कोण असे विचारण्यात आले तेव्हा दिशाने टायगरचे नाव घेतले. यासोबतच ती म्हणाली की टायगर श्रॉफ जे स्टंट करतो ते दुसरे कोणीही करू शकत नाही, अशाप्रकारे तिने टायगरचे कौतुक केले आहे. यासोबतच तिला हॉलीवूडमधील आवडता अ‍ॅक्शन हिरोबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने, अभिनेता जॅकी चेन यांचे नाव सांगितले. दिशा पटानी पुढे म्हणाली, “मी त्याच्याबरोबर ‘कुंग फू योगा’ चित्रपटात काम केले आहे आणि माझा अनुभव खूप चांगला होता.”

 

View this post on Instagram

 

Go green❤️ @tigerjackieshroff #baaghi2onmarch30 ❤️💪🏻

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास दिशा पटानी लवकरच ‘मलंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दिशा अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूरसोबत दिसणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)