Disha Patani Hollywood Debut | अभिनेत्री दिशा पटानीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तिच्या स्टाईलने ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच मोठे यश मिळवल्यानंतर दिशा आता हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर दिशा पटानीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यावरून दिशा आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिशा ‘फास्ट अँड फ्युरियस’ स्टार टायरेस गिब्सन आणि अभिनेता हॅरी गुडविन्स सोबत दिसत आहे. यावरून आता दिशाने हॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकल्याचे म्हंटले जात आहे. मात्र याबाबत अद्याप तिने कोणतीही अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. Disha Patani Hollywood Debut |
याशिवाय अहमद खान दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिशा पटानीही दिसणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे आणि 2025 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
दिशा पटानी शेवटची साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिसली होती. कल्कि 2898 AD मध्ये, दिशाने अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली होती. Disha Patani Hollywood Debut |
हेही वाचा:
VIDEO : डिलिव्हरी बाॅयच्या वेशात घरफोडी करणाऱ्यासह साथीदार गजाआड