मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या आगामी ‘केटिना’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात देखील झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवरील तिचा फोटो नुकताच शेअर करण्यात आला आहे. एकता कपूर या चित्रपटाची निर्माती असून तिने तिचा हा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
दिशानेही हा फोटो सोशल मीडिवार शेअर केला आहे. त्यात तिने कॅप्शन देत म्हटलय की केटिना का सबको जय माता दी…बट यार इतनी रिंग्स कौन पेहनता है…अशा ओळी तिने लिहिल्या आहेत. या फोटोमध्ये दिशाने हुबेहुब एकतासारखी वेशभूषा धारण केली असून एकताप्रमाणेच तिने हात जोडल्याचे पहायला मिळत आहेत. यासोबतच एकता ज्याप्रकारे तिच्या हातात अनेक अंगठ्या घालते अगदी तशाच अंगठ्या दिशानेही तिच्या बोटांमध्ये घातलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पहायला मिळतेय.
IT’S OFFICIAL… Disha Patani starrer – produced by Ekta Kapoor – titled #KTina… Filming begins today… Here’s Disha’s look from the film… Directed by Ashima Chibber… Written by Raaj Shaandilyaa, who directed #DreamGirl. pic.twitter.com/HL8z0TojHG
— taran adarsh (@taran_adarsh) October 25, 2019
या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे याचा उलगडा अजून करण्यात आलेला नाही. या चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत ही माहिती देखील गुलदस्त्यात आहे. दरम्यान, दिशाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून तिचे फॅन्स यावर मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.