मुंबई – दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रपटांच्या अपडेट व्यतिरिक्त ती सोशल मीडियावरून आपल्या रोजच्या लाईफमधील घडामोडींबाबत फॅन्सला अपडेट देत असते.दिशा पटानीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, ‘माझे प्रोटीन घेण्याचे धाडसही करू नका.’ यासोबतच तिने धमाकेदार इमोजी देखील शेअर केला आहे. दिशाने एक रील व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये ती आणि तिचे जिम इंस्ट्रक्टर भांडत असल्याचे दिसते.प्रोटीन शेकसाठी दोघेही अक्षरशः हाणामारी करताना दिसून येतात.
व्हिडिओमध्ये दोघेही प्रोटीनसाठी काउंटरवर पोहोचतात.प्रोटीनची एकच बॉटल असते.दोघेही आपापसात लढू लागतात. मात्र, त्याच दरम्यान आणखी एक मजबूत पैलवान येतो आणि दोघांमधील बॉटल उचलून निघून जातो. ते दोघेही त्याला आवाज देऊन अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याची बॉडी पाहून दोघेही माघार घेतात.
View this post on Instagram
दिशाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. अर्ध्या तासात त्याला 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.तर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. दिशा अनेकदा आपले बोल्ड फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.