मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. दिशाचा बोल्ड लूक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो.
ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील फोटो.
सोशल मीडियावरील वातावरणच बदलून टाकतात. दिशाच्या या फोटोंवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, पुन्हा एकदा दिशाने असाच एक नवीन फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून, यामध्ये ती अतिशय हॉट अँड मादक दिसत आहे. यामध्ये दिशा पाटणी शिमरी गाऊनमध्ये खूप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
या लूकसाठी दिशा ने आपले केस वेव्ही लूकसह खुले ठेवले आहेत. त्यामुळे दिशाच्या हॉट लुकला चार चांद लागले आहेत. सध्या तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावरील वातावरणच बदलून टाकतात.