दिशा पाटणी सध्या आपल्या कुटुंबीयांबरोबर “होम क्वारंटाईन’ झाली आहे. या काळात तिला घराच्या बाहेर पडणे तर शक्यच नाही. कोणतेही शूटिंग नाहे, इव्हेंट नाही, सेलिब्रिटी टॉक नाही, त्यामुळे ती खूप बोअर व्हायला लागली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देखील ती सोशल मिडीयावर खूप ऍक्टीव्ह असते. आपले फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळे अपडेट ती फॅन्सना देत असते.
असाच एक फोटो तिने शेअर केला आहे, त्यात ती क्वारंटाईनमुळे बोअर झालेली स्पष्ट दिसते आहे. सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठीही तिला काही मूड नसल्यासारखा तिचा चेहरा उतरला आहे.
या फोटोला जरा झूम करून बघितले तर दिशाच्या चेहऱ्यावर डास चावल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. “डास जेंव्हा बरोबर चेहऱ्यावर चावतात….’ अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. मात्र तिच्या फॅन्सना हा फोटो अगदी क्युट वाटतो आहे.
तिच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही, असे काही फॅन्सनी म्हटले आहे. दिशाचा अगदी अलीकडे “मलंग’ येऊन गेला. आता सलमानबरोबर “राधे’ मध्येही ती दिसणार आहे.