Disha Patani | Airport Look | Summer Look – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. । Disha Patani | Airport Look | Summer Look
नुकतंच अभिनेत्री दिशा पटानी विमानतळावर स्टायलिश क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये दिसली. दिशा तिच्या हॉट आणि सिझलिंग लुक्ससाठी ओळखली जाते आणि असाच काहीसा अंदाज आज देखील पाहायला मिळाला.
दिशा जेव्हाही बाहेर जाते तेव्हा ती तिच्या अप्रतिम फॅशन सेन्सने आणि अतुलनीय सौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेते. तुम्ही देखील तिचा लेटेस्ट एअरपोर्ट लुक ट्राय करू शकता. दिशाचा एअरपोर्ट लुक हा सहज शैली आणि आरामदायी आहे,
ज्यामुळे तो उन्हाळ्यासाठी योग्य आहे. या लूक सोबत तिने फरची बॅग कॅरी केली आहे. काळा चष्मा लावून तिने हा लूक पूर्ण केला आहे. सध्या अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. । Airport Look | Summer Look