नवी दिल्ली – करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. देशातील कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ३ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.
My friend’s sister like my baby sister was asked by a neighbour in an elite colony to sleep with him for an oxygen cylinder that she desperately needed for her father;
What action can be taken because the b* will obviously deny, no?#HumanityIsDead
— Bhavreen Kandhari (@BhavreenMK) May 11, 2021
तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार देखील या स्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र आहे. मात्र अशा कठीण काळातही काही ठिकाणी माणुसकी जपली जात आहे. तर काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहे.
लोकांच्या हतबलतेचा, गरीब परिस्थितीचा अनेक ठिकाणी गैरफायदा घेतला जात आहे. अशातच मानवतेला काळीमा फासणारा प्रकार सोशल मीडियातून चव्हाट्यावर आला आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा धक्कादायक प्रकार ट्विटरवरून उजेडात आला आहे. या प्रकारा -विरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेत होती. अनेक ठिकाणी चौकशी करून देखील मुलीला ऑक्सिजन मिळाला नाही. त्यानंतर मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर त्या नराधमानं मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. त्यानंतर त्या मुलीनं ही गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली.
या प्रकाराबाबत एका तरुणीने सोशल मीडियातून वाचा फोडली आहे. त्यानंतर तिने यासंदर्भात पोस्ट करताच सोशल मीडियातील हजारो तरुण-तरुणींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. भावरीन कंधारी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. त्यांनी ट्विटरवर #HumanityIsDead अशी मोहिम चालवली आहे.