पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. काही महिन्यापूर्वी ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. त्यांना भाजप पक्षातील नेत्यांकडून पक्षात येणासाठी ऑफर दिल्याचे तर्कवितर्क व्यक्त केले जात होते.
अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्या कधी येताय… वाट पाहतोय… अशी खुली ऑफरच दिली आहे. वसंत मोरे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मोरे हे आधीच मनसेत नाराज आहेत. त्यात आता त्यांना थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच पक्षात येण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने तात्या अर्थात वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.