पेठ – येथील वलखेडवस्ती येथील शेतातील गोल्डन जातीच्या वाटाणा पिकाची तोडणी सुरू आहे. मागील पंधरा दिवसांत पाऊस न झाल्याने व तीव्र उन्हामुळे वाटाणा पिकावर रोगराई आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
येथील शेतकरी महेंद्र मुरलीधर धुमाळ सह अन्य शेतकऱ्यांच्या पिकावर रोगराई पसरली आहे. शेतकऱ्यांना वाटाणा पिकावर फवारणी, खते, औषधे, मजुरीसाठी जवळपास 25 हजार रुपये खर्च येतो.
सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे वाटाण्याला चांगली मागणी वाढली आहे. सध्या दहा किलोला 800 ते 900 रुपये भाव मिळत आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या वाटाण्याच्या तीन तोडण्या झाले असून अजून तीन-चार वेळा तोडणी होईल. तसेच पितृपक्षामुळे बाजारभाव अजून वाढेल, असा अंदाज शेतकरी महेंद्र धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.