कोलकाता – कोलकात्यातील एनआरएस हॉस्पिटलमधील एका कनिष्ठ डॉक्टरवर १०जून रोजी झालेल्या हल्ल्यानंतर येथील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला असून यामुळे राज्यभरातील सरकारी दवाखान्यांमधील वैद्यकीय सवांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर काल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या सर्व मागण्या राज्यसरकारने मान्य केल्याची माहिती दिली होती.
राज्यसरकारने कनिष्ठ डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची भूमिका जाहीर केल्याने आज संपावर असलेल्या एनआरएस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अंतर्गत विचारविनिमयानंतर थोडसं नमतं घेतं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.
मात्र या चर्चेबाबत संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांनी काही अटी ठेवल्या असून यामध्ये मुख्यमंत्र्यांसमवेतची चर्चा बंद दारांमागील नसावी ही प्रमुख मागणी ठेवण्यात आली आहे. तसेच या बैठकीत माध्यम प्रतिनिधींचा समावेश असावा व सदर बैठकीचे व्हिडीओ चित्रण व्हावे अशा अटी देखील डॉक्टरांनी ठेवल्या आहेत.
Junior doctors of #NRSMedicalCollege and Hospital, Kolkata, West Bengal, after a general body meeting: We want immediate end to this impasse by discussion with the CM, which, to maintain transparency, shouldn't be behind closed doors, but open to media under camera coverage. pic.twitter.com/N8Spu1yRci
— ANI (@ANI) June 16, 2019